सामान्य नागरिकांपर्यंत न्यायसेवा आणि कायदेविषयक माहिती पोहोचवण्यासाठी खानापूर तालुका विधी सेवा प्राधिकरणातर्फे ई-सेवा वाहन सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागात कायदेविषयक जनजागृती केली जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाची ई-कोर्ट समिती, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि खानापूर तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘न्यायसेवा आता आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्येष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश चंद्रशेखर तळवार, दिवाणी न्यायाधीश दानप्पा आणि प्रथम अतिरिक्त न्यायाधीश नयना एस. अळवंडी यांनी पूजन करून वाहनाला हिरवा झेंडा दाखविला.

या वाहनाद्वारे खानापूर तालुक्यातील हळकर्णी, रामगुरवाडी, नंदगड, हेब्बाळ आणि हलशी ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात नागरिकांना कायदेविषयक माहिती दिली जाणार आहे.
यावेळी खानापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. ईश्वर घाडी, अॅड. सादिक नंदगडी, अॅड. व्ही. एन. पाटील, अॅड. सिद्धार्थ होगल यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments