विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यात बसच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवास करावा लागत असल्याचे समोर आले आहे. मुद्देबिहाळ ते बैलकूर मार्गावरील बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने विद्यार्थ्यांना बसच्या दारात उभे राहून प्रवास करावा लागत आहे.
या मार्गावरील बसमध्ये बसण्यासाठीच नव्हे, तर उभे राहण्यासाठीही जागा उपलब्ध नसते. त्यामुळे विद्यार्थी चालत्या बसच्या दारात उभे राहून प्रवास करत आहेत. अशा प्रवासात थोडा तोल गेला तरी अपघात होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून मुद्देबिहाळ-बैलकूर मार्गावर अतिरिक्त बस सुरू कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी परिवहन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.


Recent Comments