Vijayapura

टिपू सुलतान यांच्या शौर्याचा काहींना स्वीकार नाही : मंत्री काशप्पनवर

Share

टिपू सुलतान यांचे शौर्य आणि पराक्रम काहींना सहन होत नाहीत. पूर्वी गरजेनुसार टिपू सुलतान यांचा वेश धारण करून तलवार हातात घेऊन छायाचित्रांसाठी पोझ देणारेच आता त्यांच्याविरोधात बोलत आहेत, अशी टीका मंत्री विजयानंद काशप्पनवर यांनी केली.

विजापूर जिल्ह्यातील ताळिकोटे येथे हजरत टिपू सुलतान संरक्षण समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. विजापूरमधील राजकीय घडामोडींचा उल्लेख करताना, ‘विजापूरमध्ये वेडं कुत्रं नाही, तर वांझ म्हैस आहे,’ अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.

यापूर्वी विधानसौधमध्ये सहाव्या क्रमांकाची जागा होती. आता ती २२४ व्या क्रमांकावर आली आहे. येत्या १८ महिन्यांत ती जागाही जाणार आहे, असे सांगत मंत्री विजयानंद काशप्पनवर यांनी यत्नाळ यांच्यावर आणखी एक राजकीय टीकास्त्र सोडले.

Tags: