State

जपानमध्ये मुख्यमंत्र्यांची भारतीय राजदूतांशी गुंतवणुकीबाबत चर्चा

Share

जपान दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी टोकियो येथे भारताच्या राजदूत नगमा मोहम्मद मलिक यांची भेट घेतली.

या भेटीत कर्नाटकात अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासह भारत-जपान व्यापार संबंध वृद्धिंगत करण्याबाबत चर्चा झाली.

कर्नाटक आणि जपानमधील व्यापारी संबंध अधिक दृढ करणे तसेच राज्यातील गुंतवणुकीच्या संधी यावर दोन्ही बाजूंनी चर्चा केली. यावेळी जीबीएचे मुख्य आयुक्त एम. महेश्वर राव आणि वाणिज्य व उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. एस. सेल्वकुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: