बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार मुन्ना बागवान यांना ‘राष्ट्रीय समाजसेवा रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. कन्नड राज्योत्सवानिमित्त २९ नोव्हेंबर रोजी म्हैसूर येथे होणाऱ्या ‘रैत संभारमोत्सव-२०२६’ या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
चिरायु कन्नड वाहिनी, धारवाड येथील प्रतिफल फाउंडेशन आणि अलायन्स इंटरनॅशनल क्लब ऑफ करुनाड, म्हैसूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कन्नड भाषा, साहित्य, संस्कृती, संगीत, शेती, माध्यम, शिक्षण आणि कला अशा विविध क्षेत्रांत सातत्याने योगदान देणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
मुन्ना बागवान यांचे उल्लेखनीय कार्य आणि समाजाभिमुख सेवांची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता म्हैसूर येथील जिल्हा कन्नड साहित्य परिषदेच्या कन्नड भवनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


Recent Comments