Belagavi

उषा कॉलनीतील महालक्ष्मी मंदिराच्या महाद्वाराचे भूमिपूजन

Share

बेळगावच्या उषा कॉलनीतील श्री महालक्ष्मी मंदिराच्या महाद्वार बांधकामाचे भूमिपूजन गुरुसिद्ध स्वामीजी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी आमदार अनिल बेनके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बेळगावच्या बॉक्साइट रोडवरील उषा कॉलनीत असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या महाद्वार बांधकामासाठी कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात विधिवत भूमिपूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला माजी आमदार अनिल बेनके, पंचाक्षरी हिरेमठ, सुजीत मुळगुंद, प्रवीण मोतीमठ, राजू पाटील, कल्लाप्पा गाणिगेर, विरुपाक्ष हादीमनी, निरंजन शास्त्री, शंकरय्या आणि बसवराज हळ्ळींगळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आय. व्ही. हिरेमठ, सतीश माळवदे, नागेश पाटील, प्रकाश हेगडे, सागर वरपे, प्रभू सवदत्ती यांच्यासह स्थानिक भाविक आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Tags: