Bagalkot

बनहट्टीत काँग्रेसचे ‘मत वाचवा, देश वाचवा’ आंदोलन

Share

मतदार यादीच्या विशेष सखोल फेरतपासणी प्रक्रियेला विरोध करत काँग्रेसने बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी येथे ‘मत वाचवा, देश वाचवा’ आंदोलन केले. पात्र मतदारांची नावे वगळली जाण्याची भीती व्यक्त करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात निदर्शने केली.

तेरदाळ ब्लॉक काँग्रेसच्या वतीने सिद्धू कोन्नूर यांच्या नेतृत्वाखाली बनहट्टीतील ईश्वरलिंग मैदानापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत आंदोलन मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. एसआयआर प्रक्रिया तातडीने रद्द करावी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

एसआयआर प्रक्रियेच्या नावाखाली पात्र मतदारांची नावे जाणीवपूर्वक मतदार यादीतून वगळली जाण्याची भीती काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली. विशेषतः दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजातील मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या घटकांच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करत आंदोलनाच्या शेवटी तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले.

Tags: