Kagawad

उगारच्या बारिगड्डी मार्गाचे डांबरीकरण; आमदार राजू कागे यांच्या हस्ते कामाचा प्रारंभ

Share

उगार येथील बारिगड्डी मार्गाच्या डांबरीकरण कामाचा प्रारंभ आमदार राजू कागे यांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना ऊस वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

या मार्गावरून सुमारे ५०० एकर क्षेत्रातील ऊस वाहतूक केली जाते. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन यापूर्वी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. आता रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी परस्पर सहकार्य करून दर्जेदार रस्ता तयार होण्यासाठी मदत करावी, असे आवाहन आमदार राजू कागे यांनी केले. शनिवारी सकाळी त्यांनी राजू कांबळे रस्त्याच्या कामाचे पूजन करून प्रारंभ केला.

आमदारांचे निकटवर्तीय आणि माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू कांबळे यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन आमदार राजू कागे यांनी रस्त्याच्या विकासासाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले. डांबरीकरणामुळे शेतकऱ्यांची ऊस वाहतूक अधिक सुलभ होईल, असेही त्यांनी नमूद केले.

प्रारंभी कृष्णा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकर वाघमोडे, परशुनाळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मलागौडा पाटील, राजू कांबळे आणि प्रेम बालाजी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. अभियंता सतीश शंकरहट्टी आणि कंत्राटदार सतीश शिंदे यांनी आमदारांना कामाची माहिती दिली.

यावेळी विनायक कांबळे, तानाजी शेट्टी, नासिर पठाण, अप्पासाहेब ऐहोळे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Tags: