राज्यातील परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणून आवश्यक सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीशी चर्चा केली.

विधानसौध येथील समिती सभागृहात झालेल्या बैठकीत परीक्षा प्रक्रियेतील सुधारणांचा आराखडा आणि अंमलबजावणीबाबत विचारविनिमय करण्यात आला.


या बैठकीला उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष नंदन निलेकणी, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष यू. टी. खादर, मंत्री बसवराज रायरेड्डी, प्रियांक खर्गे, मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश, राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष एस. व्ही. रंगनाथ, सदस्य विजयभास्कर आणि कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी डॉ. एच. प्रसन्न यांच्यासह शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments