Khanapur

डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडे केंद्रशासित प्रदेशांचा अतिरिक्त कार्यभार

Share

खानापूरच्या माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडे पक्षाने केंद्रशासित प्रदेशांची अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे.

गोव्याच्या प्रभारी म्हणून काम पाहत असलेल्या डॉ. निंबाळकर यांच्याकडे आता दादरा नगर हवेली आणि दमण दीव या केंद्रशासित प्रदेशांचाही कार्यभार देण्यात आला आहे. पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने ही नियुक्ती केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांच्या निर्णयानुसार ही अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.

गोव्यामध्ये पक्ष संघटनेची जबाबदारी सांभाळत असलेल्या डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडे नव्या कार्यभाराची भर पडल्याने त्यांच्या नियुक्तीबद्दल पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांकडून अभिनंदन केले जात आहे.

Tags: