Kagawad

कागवाड तालुक्यात तीन इंदिरा कॅन्टीनचा शुभारंभ

Share

कागवाड तालुक्यातील कागवाड, शेडबाळ आणि ऐनापूर येथे इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात आली असून या कॅंटीनमध्ये माफक दरात विविध खाद्यपदार्थांची चव चाखता येणार आहे.

शेडबाळ येथे नगरपंचायत मुख्याधिकारी के. के. गावडे यांच्या हस्ते तर कागवाड येथे तहसीलदार रवींद्र हादिमनी यांच्या हस्ते तर ऐनापूर येथे नगरपंचायत अध्यक्षा लक्कव्वा अडिकेरी यांच्या हस्ते पूजन करून कॅन्टीनचा शुभारंभ करण्यात आला.

या कॅन्टीनमध्ये सोमवार ते रविवार वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ दिले जाणार आहेत. पाच रुपयांत नाश्ता आणि दहा रुपयांत जेवण उपलब्ध असून, नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

कागवाड येथील कार्यक्रमात मुख्याधिकारी प्रसन्नकुमार कल्याणशेट्टी यांनी योजनेची माहिती दिली. तर ऐनापूर येथील कार्यक्रमात मुख्याधिकारी महांतेश कोल्हापूर यांनी योजनेची माहिती दिली.

तिन्ही ठिकाणी कॅन्टीन सुरू झाल्यानंतर नागरिकांनी भेट देऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. विविध ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात शेडबाळ नगरपंचायत उपाध्यक्ष दीप होनकांबळे, कागवाड नगरपंचायत सदस्य प्रकाश पाटील, ऐनापूर नगरपंचायत उपाध्यक्ष विजय हरळे यांच्यासह नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते.

— सुकुमार बन्नुरे, इन न्यूज, कागवाड

Tags: