खानापूर तालुक्यातील हेब्बाळ गावात आयोजित हरिभक्त पारायण महोत्सवाचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते विधिवत पार पडले.

याप्रसंगी आमदारांनी श्री माऊलींचे दर्शन घेऊन विशेष पूजा केली आणि वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय परंपरेचा गौरव केला.


भक्तिमय वातावरणात सुरू असलेली ही वारकरी परंपरा अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक संस्कृतीचे दर्शन घडवते, असे गौरवोद्गार आमदार हलगेकर यांनी यावेळी काढले. या सोहळ्यास वारकरी बांधव, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments