राज्य सरकारने विविध महामंडळे आणि प्राधिकरणांवर नवीन संचालकांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले असून, यामध्ये चिक्कोडी-सदलगा मतदारसंघातील पाच नेत्यांना संधी देण्यात आली आहे.
या नियुक्त्यांमध्ये कर्नाटक राज्य जैवविविधता मंडळाच्या संचालकपदी रवींद्र शंकर मिर्जी, बागलकोट येथील कुडल संगम विकास प्राधिकरणाच्या संचालकपदी मल्लिकार्जुन ज्योतीगौडा पाटील आणि हुबळी येथील कर्नाटक हातमाग विकास महामंडळाच्या संचालकपदी अनिल विठ्ठल पाटील यांची वर्णी लागली आहे. तसेच हुबळी वीज पुरवठा कंपनीच्या संचालकपदी श्यामराव राजाराम रेवडे आणि कर्नाटक राज्य हस्तकला विकास महामंडळाच्या संचालकपदी विद्याधर बाळासाहेब कागे यांची नियुक्ती झाली आहे.

पक्ष संघटना आणि सामाजिक क्षेत्रातील सक्रिय कामाची दखल घेत सरकारने ही जबाबदारी सोपवली आहे. नवनियुक्त संचालकांनी आपल्या कार्यकाळात चांगले काम करून तालुका आणि राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, अशा शुभेच्छा स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. यावेळी नवनियुक्त संचालक अनिल पाटील आणि श्याम रेवडे यांनी या निवडीबद्दल आमदार गणेश हुक्केरी आणि विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांचे आभार मानले.


Recent Comments