धारवाड येथील कचरा विल्हेवाट केंद्रातील कचऱ्याला आग लागल्याने परिसरातील नागरिकांना विषारी धुराचा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे.
धारवाडमधील जनता नगरजवळ असलेल्या हुबळी-धारवाड कचरा विल्हेवाट केंद्रात शहरातील कचरा टाकला जातो. या कचऱ्याच्या ढिगाला वारंवार आग लावली जात असल्याने परिसरात धुराचे प्रमाण वाढत आहे. जनता नगर, बनशंकरी नगर, लक्ष्मी नगर आणि टोलनाका परिसरातील रहिवाशांना या धुरामुळे आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

कचऱ्याला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना प्रयत्न करावे लागले. अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, दर दोन दिवसांनी कचऱ्याच्या ढिगाला आग लागण्याचे प्रकार घडत असल्याने महानगरपालिकेने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.


Recent Comments