श्रवणबेळगोळ येथील दिगंबर जैन मठाचे पीठाधीश अभिनव चारुकीर्ती भट्टारक महास्वामीजी यांचे १५ नोव्हेंबरला प्रथमच बेळगावात आगमन होणार आहे. यानिमित्त भव्य मिरवणूक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी ३ वाजता जुन्या पी.बी. रोडवरील पिंपळ कट्टा येथून मिरवणुकीला प्रारंभ होईल. होसूर, कोरे गल्ली, गोवावेस आणि महावीर भवनमार्गे मिरवणूक हिंदवाडी येथील गोमटेश विद्यापीठात पोहोचेल.

मिरवणुकीत विविध वाद्यपथके, ३३ महिला मंडळे आणि कलाकार सहभागी होणार आहेत. विद्यापीठात गोमटेश स्तुती, दीपप्रज्वलन, पादपूजा, अष्टद्रव्य पूजा आणि महास्वामीजींचे आशीर्वचन असे धार्मिक कार्यक्रम होतील.
२०२३ मध्ये श्रवणबेळगोळच्या दिगंबर जैन मठाचे पीठाधीशपद स्वीकारल्यानंतर महास्वामीजी प्रथमच बेळगावला येत आहेत. या सोहळ्याला जैन बांधव आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त जैन समाज, बेळगाव यांच्यावतीने करण्यात आले आहे.


Recent Comments