बागलकोट येथील ओम ज्वेलर्समध्ये गॅस कटरच्या साहाय्याने शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. लाल रंगाच्या कारमधून आलेल्या तिघांनी ही चोरी केली असून, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

बागलकोटच्या नवनगर येथील सेक्टर क्रमांक २६ मधील या दुकानात मध्यरात्री चोरट्यांनी प्रवेश केला. शोकेस आणि लॉकरमधील दागिने पोत्यात भरून त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.


घटनेची माहिती मिळताच नवनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच ठसेतज्ज्ञांनीही तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.


Recent Comments