Vijayapura

विजापूरच्या शेतकऱ्यांना पंचगाव क्रॉसवर पोलिसांनी रोखले

Share

विजापूर जिल्ह्यातील शेतकरी नेते शांतगौड पाटील नडहळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली हत्तरगा टोलनाक्याकडे निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखल्याची घटना घडली. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील उदपुडी ग्रामपंचायत हद्दीतील पंचगाव क्रॉस येथे पोलिसांनी शेतकऱ्यांची वाहने अडवून त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला.

यावेळी शेतकरी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. शेतकऱ्यांची वाहने रोखण्याच्या पोलिसांच्या कारवाईबद्दल आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शेतकरी नेते चून्नप्पा पुजारी आणि शशिकांत गुरूजी यांची तातडीने सुटका करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या आंदोलनात अडथळे आणण्याऐवजी त्यांच्या मागण्यांना प्रतिसाद द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

Tags: