Belagavi

राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत बेळगाव विभागीय संघाला विजेतेपद

Share

कोलार येथील केजीएफमध्ये झालेल्या १७ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत बेळगाव विभागीय संघाने विजेतेपद पटकावले. या संघातील खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठीही निवड झाली आहे.

तीन साखळी सामन्यांपैकी दोन सामने जिंकून धावसरासरीच्या आधारे बेळगाव विभागाने प्रथम स्थान मिळवले. या संघात एकूण १७ खेळाडूंचा समावेश होता. त्यामध्ये बेळगावच्या पाच खेळाडूंनी प्रतिनिधित्व केले.

प्रज्वल जबगौंड यांच्या नेतृत्वाखाली संघाने ही कामगिरी केली. मोहम्मद नवाज मुजावर, श्रीनिवास पंचाक्षरी, मल्लिकार्जुन पुजारी, रोहित चलवादी, समर्थ भागवती, अमोघ हिरेमठ, आकाश तलकेरी, सूरज राठोड, सदानंद बिरादार, राजू कदम, अमर मंतूर, समर्थ नावगेकर, अर्जुन यळूरकर, अनिश तेंडुलकर आणि स्वराज जुवेकर हे खेळाडू संघात होते.

प्रशिक्षक लोकेश कांबळे, विजयकुमार हल्लादमनी आणि यासीन कत्नाळी यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने ही कामगिरी केली.

Tags: