Belagavi

हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या मराठी भाषिकांचा मुख्यमंत्र्यांना धसका

Share

बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कन्नड भाषिकांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी चिंता व्यक्त केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र एकीकरण समिती असो किंवा कन्नड भाषिक, कायदा सर्वांसाठी समान आहे. राज्यात राहणाऱ्या प्रत्येकाने या भूमीचा आणि भाषेचा आदर करावा. कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आयटी कंपन्या किंवा उद्योगांवर हल्ले करून नैतिक पोलिसगिरी करू नये. कोणतीही तक्रार असल्यास सरकार किंवा पोलिसांकडे मांडावी, असे शिवकुमार यांनी स्पष्ट केले.

कन्नड ध्वजाच्या प्रश्नावर बोलताना पिवळा आणि लाल रंग हाच कन्नड भाषिकांचा अधिकृत ध्वज असल्याचे त्यांनी सांगितले. ध्वजाबाबत धोरण तयार करून आगामी अधिवेशनात त्यावर चर्चा केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

कन्नड भाषिक कार्यकर्त्यांवरील विविध खटले मागे घेण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून, त्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याचे शिवकुमार यांनी सांगितले. कर्नाटकातील जनतेच्या संरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags: