Delhi

दिल्लीतील इंडिया आघाडीच्या रॅलीत बेळगावचे कार्यकर्ते सहभागी

Share

निवडणुकीतील कथित गैरप्रकार आणि मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकनातील (एसआयआर) अनियमिततेच्या आरोपांवरून काँग्रेस आणि इंडिया आघाडीने दिल्लीतील रामलीला मैदानावर मोठी निषेध रॅली काढली.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आवाहनानुसार देशभरातील कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली.

बेळगाव जिल्ह्यातून परशुराम वाग्गेन्नवर, मेत्री आणि गजानन धरणायक यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभाग घेतला.

Tags: