Belagavi

हिरबागेवाडीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Share

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हिरबागेवाडी येथे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. बसवेश्वर चौकात झालेल्या या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक आणि व्यवहार ठप्प झाले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारविरोधात आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

शेतकरी नेत्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या कष्टावर सत्ता चालवणाऱ्या सरकारने त्यांच्या अडचणी सोडवाव्यात; अन्यथा सरकार चालवणे शक्य नसल्यास राजीनामा देऊन घरी जावे, अशी टीका नेत्यांनी केली. मागण्यांकडे दुर्लक्ष सुरूच राहिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.

Tags: