Bagalkot

ऊसदरासाठी बागलकोट जिल्ह्यात शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

Share

कर्नाटक बंदच्या पार्श्वभूमीवर ऊसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी बागलकोट जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. केंद्र आणि राज्य सरकारांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी ऊसाला हमीभाव निश्चित करण्याची मागणी केली.

ऊसाला योग्य दर निश्चित करण्याच्या मागणीसाठी बागलकोट जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केले. मुधोळ तालुक्यातील हेब्बाळ क्रॉस येथे विजापूर-बेळगाव राज्य महामार्ग रोखून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. रस्त्याच्या मध्यभागी काटेरी कुंपण टाकून त्याला आग लावत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. जिल्ह्यातील प्रमुख जोडरस्ते बंद झाल्याने नागरिक आणि वाहनचालकांची गैरसोय झाली.

याशिवाय, बागलकोट तालुक्यातील तुळसिगेरी गावाजवळ रायचूर-बेळगाव मार्गावर, तर बिळगी तालुक्यातील यडहळ्ळी गावाजवळ बिळगी-मुधोळ मार्गावर ऊस उत्पादकांनी रास्ता रोको आंदोलन केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत ऊसाला तातडीने न्याय्य दर निश्चित करावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

Tags: