बेळगावातील शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहांना उपलोकायुक्त न्यायमूर्ती बी. वीरप्पा यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या निवासव्यवस्थेसह मूलभूत सुविधांची तपासणी करून कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

उपलोकायुक्त वीरप्पा यांनी रामतीर्थनगर येथील अल्पसंख्याक विभागाच्या मोरारजी देसाई निवासी शाळेला आणि अशोकनगर येथील मागासवर्गीय कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहाला भेट दिली. वसतिगृहातील खोल्या, स्वच्छतागृहे, स्वयंपाकघर आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधांची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून भोजनाचा दर्जा आणि शैक्षणिक व्यवस्थेची माहिती घेतली.

वसतिगृहांच्या व्यवस्थापनाचा आढावा घेताना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत अदा करावे, त्यात कोणत्याही परिस्थितीत विलंब करू नये, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच वसतिगृहांमधील स्वच्छता आणि सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.


Recent Comments