बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अनुसूचित जाती-जमातींच्या नागरिकांची मासिक तक्रार निवारण बैठक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात झाली.

या बैठकीला अनुसूचित जाती-जमातींचे सुमारे १०० ते १२० नेते आणि सदस्य उपस्थित होते. त्यांनी मांडलेल्या सर्व समस्यांचे सविस्तरपणे म्हणणे ऐकून घेण्यात आले.


पोलीस विभागाशी संबंधित तक्रारींचे प्राधान्याने आणि तातडीने निवारण करण्याच्या सूचना उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. इतर विभागांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी संबंधित विभागांना पत्र पाठवण्याची कार्यवाही करण्यात आली.

बैठकीला शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हे व वाहतूक विभागाचे डीसीपी, सर्व उपविभागांचे एसीपी, पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक, डीसीआरई पोलीस ठाणे, महसूल विभाग, महानगरपालिका आणि समाजकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments