Savadatti

सवदत्ती यल्लम्मा क्षेत्राच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध: मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार

Share

सवदत्ती यल्लम्मा ही सर्वांची संकटे दूर करणारी ‘गॅरंटी देवी’ आहे असे सांगत, राज्यातील सर्व मंदिरांमधील दागिन्यांची मोजदाद करून ते देवाच्या श्रृंगारासाठी वापरण्याची विशेष योजना लागू केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली.

उत्तर कर्नाटकाची शक्तीपीठ असलेल्या सवदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा क्षेत्रात विविध विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते करण्यात आला. भाविकांना देवीचे सुवर्णालंकृत दर्शन घडवता यावे यासाठी ही नवी योजना आखली जात असल्याचे सांगत त्यांनी क्षेत्राच्या व नगरपालिकेच्या विकासासाठी सरकारची कटिबद्धता व्यक्त केली.

खासदार जगदीश शेट्टर यांनी सवदत्तीसह बेळगाव जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांना जोडून ‘टेंपल टुरिझम कॉरिडॉर’ तयार केल्यास पर्यटन क्षेत्राला मोठा वाव मिळेल असे मत मांडले.

पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी अन्नदान भवनासोबत ‘चारा दान’ भवन आणि पार्किंग सुविधा विकसित केल्याचे सांगितले. मे २०२८ पूर्वी सर्व कामे पूर्ण करून उद्घाटन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिवकुमार यांनी दिले.

तसेच आमदार विश्वास वैद्य यांनी सवदत्ती व यरगट्टी तालुक्यातील तलाव भरण्याची योजना आगामी अर्थसंकल्पात जाहीर करण्याची आणि मुनावळी येथील आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवण्याची मागणी केली. याप्रसंगी आमदार अशोक पट्टण, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. प. सीईओ राहुल शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Tags: