सवदत्ती येथील प्रसिद्ध यल्लम्मा डोंगरावर भेट देऊन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी श्री रेणुका यल्लम्मा देवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी देवीची विशेष पूजा-अर्चा करून त्यांनी राज्यातील जनतेच्या सुखासाठी व समृद्धीसाठी प्रार्थना केली.


सोमवारी सवदत्ती येथील रेणुका यल्लम्मा डोंगरावर पोहोचलेल्या मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी श्री रेणुकादेवीचे आशीर्वाद घेऊन विशेष धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला. पूजेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी संपूर्ण राज्यात सुख, शांती नांदावी आणि जनतेचे कल्याण व्हावे, अशी प्रार्थना देवीचरणी केल्याचे सांगितले. या प्रसंगी मंत्री एच. के. पाटील, आमदार एन. एच. कोनरेड्डी, विधानसभेचे मुख्य प्रतोद अशोक पट्टण यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि प्रमुख नेते उपस्थित होते.




Recent Comments