Belagavi

शेतकरी व उद्योजकांच्या हितरक्षणावर चर्चा: संगमेश निराणी

Share

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत शेतकरी, साखर कारखाने आणि सरकार यांच्यात समन्वय राखण्याच्या दृष्टीने या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला, अशी माहिती साखर उद्योगपती संगमेश निराणी यांनी दिली.

सोमवारी बेळगावच्या सुवर्णसौध येथे आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, शेतकरी आणि साखर कारखाने या दोघांचेही हित जपण्याच्या उद्देशाने अनेक महत्त्वाच्या विषयांवर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. शेतकरी आणि कारखानदार दोघेही टिकून राहतील, असा मार्ग काढण्याच्या दृष्टीने सकारात्मक बातचीत झाली आहे.

काही विषयांवर अजून चर्चा होणे बाकी असल्याने आज संध्याकाळी पुन्हा एकदा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळच्या या बैठकीत सर्व प्रश्नांवर योग्य तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags: