बेळगाव महानगरपालिकेतर्फे सफाई कर्मचारी दिनाचे औचित्य साधून कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनासाठी विशेष क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.


दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करत मान्यवरांनी शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र राबणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सेवेचा गौरव केला.



बेळगाव महानगरपालिका आवारात आयोजित या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन महापौर प्रीती कामकर यांच्या हस्ते करण्यात आले. शहराचे आरोग्य टिकवण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे असून, ते खऱ्या अर्थाने ‘स्वच्छता सैनिक’ आहेत, असे महापौर म्हणाल्या. उपमहापौर हनुमंत काोंगानी यांनी, २३ सप्टेंबरला होणारा हा कार्यक्रम काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आला होता, कामाच्या ताणतणावातून मुक्ती व मनोरंजनासाठी या स्पर्धा आयोजित केल्याचे सांगितले. मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी कर्मचाऱ्यांमधील क्रीडागुणांना वाव देण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे नमूद केले. या स्पर्धांमध्ये सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला.



Recent Comments