‘लायन्स क्लब ऑफ बेळगाव’ आणि ‘बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना’ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर कर्नाटकातील सर्वांत मोठी राष्ट्रीय स्तरावरील फिडे मानांकित बुद्धिबळ स्पर्धा २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बद्दल संघटनेचे अध्यक्ष दिनेश रामचंद्र भिरडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. केपीटीसीएल हॉल येथे होणाऱ्या या स्पर्धेत रॅपिड, ब्लिट्झ आणि पझल प्रकारांचा समावेश असून, विजेत्यांना एकूण ७.२५ लाखांपेक्षा जास्त रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. या प्रतिष्ठित स्पर्धेत आतापर्यंत २ ग्रँड मास्टर आणि १९ आंतरराष्ट्रीय मास्टर्ससह इतर राज्यांतून शेकडो खेळाडूंनी नोंदणी केली आहे. बेळगावात बुद्धिबळ खेळाला प्रोत्साहन देणे आणि स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



Recent Comments