Belagavi

वडगाव लक्ष्मी व्यंकटेश मंदिरात शारदीय नवरात्रौत्सव थाटात

Share

शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त बेळगाव येथील वडगाव स्थित श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेल्या आणि विजयादशमीपर्यंत चाललेल्या या धार्मिक महोत्सवात हजारो भाविकांनी सहभागी होऊन श्रीनिवासाचे दर्शन घेतले.

वडगाव येथील श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिरात व्यंकटेश सेवा संघातर्फे नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवानिमित्त दररोज पहाटे सुप्रभात सेवा, गोविंद नामावली, नगर संकीर्तन, पंचामृत अभिषेक, आकर्षक अलंकार पूजा आणि षोडशोपचार पूजा संपन्न झाली. दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन तर संध्याकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

विशेष म्हणजे दररोज संध्याकाळी श्री संतोष आचार्य जोशी यांच्या ‘श्रीनिवास कल्याण’ पुराण प्रवचनाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर भव्य कल्याणोत्सव आणि पुराण सांगता समारंभाने या नऊ दिवसांच्या धार्मिक महोत्सवाची श्रद्धा व भक्तीभावाने सांगता झाली.

Tags: