बेळगावमध्ये ऑनलाइन ॲपवर आधारित रॅपिडो, ओला आणि उबेर सेवांच्या विरोधात ऑटो चालकांनी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा प्रशासनाने यावर योग्य कारवाई न केल्यास येत्या ११ नोव्हेंबरपासून शहरात ऑटो सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा इशारा बेळगाव ऑटो रिक्षा मालक आणि चालक संघटनेने दिला आहे.

बेळगाव ऑटो रिक्षा मालक आणि चालक संघटनेच्या वतीने २६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले जाणार आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री आणि वाहतूक मंत्र्यांनाही पाठवण्यात येणार असून, बेकायदेशीर ॲप आधारित सेवांवर तातडीने बंदी घालण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाने यावर योग्य पावले न उचलल्यास ११ नोव्हेंबरपासून बेळगाव शहरातील सर्व ऑटो रिक्षांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाईल, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष मन्सूर होंगेकर, उपाध्यक्ष गौतम कांबळे आणि सरचिटणीस मोहम्मद रफीक देवलापूर यांनी दिली. या आंदोलनाच्या तयारीची जबाबदारी संघटनेचे सदस्य अजीमुल्ला, सुरेश रेजकणवर, रफीक मणियार आणि मुन्ना हवालदार यांनी घेतली आहे.


Recent Comments