बागलकोट जिल्ह्यातील इळकल येथील एका पेट्रोल पंपावर कारने मागच्या बाजूने येऊन बाईक आणि डिझेल डिस्पेन्सर यंत्राला जोरदार धडक दिल्याची भीषण घटना घडली आहे. या अपघातात सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून, जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इळकल शहरालगत असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून पुढे जाणाऱ्या वाहनांच्या दरम्यान हा अपघात झाला. पेट्रोल भरून जात असलेली एक कार अचानक वेगात रिव्हर्स घेतल्यामुळे हा प्रकार घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने थेट बाईकला धडक दिली आणि त्यानंतर वेगात जाऊन डिझेल डिस्पेन्सर यंत्रावर आदळली. या भीषण धडकेत बाईकवर असलेल्या दोघांपैकी एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पेट्रोल पंपावर हा अपघात घडताच तिथे उपस्थित असलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेऊन पेट्रोल पंप व यंत्रावर पाणी फवारले. यामुळे आग लागण्याचा धोका टाळण्यात आला आणि एक मोठी दुर्घटना टळली. या संपूर्ण अपघाताचे दृश्य पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.


Recent Comments