Bellary

बळ्ळारीत किल्ल्यावरील तळ्यात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू

Share

बळ्ळारी येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या टेकडीवर एक अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. सणांनिमित्त कुटुंबासह किल्ला पाहण्यासाठी आलेले वडील आणि त्यांच्या दहा वर्षांच्या मुलाचा टेकडीवरील तळ्यात बुडून मृत्यू झाला.

आंध्र प्रदेशातील कणेकल येथील रहिवासी असलेले रमेश (३८) आणि त्यांचा मुलगा होन्नूरस्वामी (१०) अशी मृतांची नावे आहेत. सणाच्या सुट्टीनिमित्त कुटुंबासह बळ्ळारी किल्ला पाहण्यासाठी आले असताना, लहानगा होन्नूरस्वामी टेकडीवरील तळ्यातील मासे पाहण्यासाठी गेला आणि मासे पकडण्याच्या प्रयत्नात त्याचा पाय घसरून तो तळ्यात पडला. पाण्यात बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी वडील रमेश यांनी तातडीने तळ्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम राबवत दोघांचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी कौल बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Tags: