जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा महोत्सवाच्या अंतिम टप्प्यातील ऐतिहासिक जंबो सवारी सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला. म्हैसूर राजघराण्याचे सदस्य तथा खासदार यदुवीर ओडेयार आणि मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी चामुंडेश्वरी देवीच्या सुवर्ण अंबारीचे पूजन करून मिरवणुकीचे उद्घाटन केले.


म्हैसूर राजवाड्याच्या प्रांगणात ७५० किलो वजनाच्या सुवर्ण अंबारीत विराजमान झालेल्या माता चामुंडेश्वरी देवीच्या मूर्तीचे शास्त्रोक्त पूजन करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्याला विविध राज्यांतील मान्यवर आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.



यंदा कॅप्टन प्रशांत या हत्तीने प्रथमच ७५० किलो वजनाची सोन्याची अंबारी पेलली. त्याच्या दोन्ही बाजूंना निशान आणि कुमकी हत्तींनी साथ दिली. राजवाड्यापासून बन्नीमंटपपर्यंत निघालेल्या या भव्य मिरवणुकीत राज्याची संस्कृती आणि प्रगतीचे दर्शन घडविणारे ६० आकर्षक स्तब्धचित्रे आणि ५० हून अधिक सांस्कृतिक कलापथकांनी सहभाग घेतला. याशिवाय सिनेसृष्टीतील कलाकार आणि ११ देशांचे राजदूत या सोहळ्याचे साक्षीदार ठरले.




Recent Comments