Belagavi

महिला सक्षमीकरणासाठी सकल मराठा समाजाचे महत्त्वपूर्ण पाऊल

Share

समाजसेवक किरण जाधव यांच्या हस्ते बेळगाव येथे मनीषा पाटील यांनी सुरू केलेल्या नूतन ‘भाकरी केंद्रा’चे उद्घाटन अत्यंत उत्साहात पार पडले.

महिलांचे आर्थिक सबलीकरण आणि स्वावलंबन घडवून आणण्याच्या उद्देशाने सकल मराठा समाजाच्या वतीने प्रोत्साहन देण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून बेळगाव येथे मनीषा पाटील यांनी सुरू केलेल्या नूतन ‘भाकरी केंद्रा’चे उद्घाटन भाजप व समाजसेवक किरण जाधव यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले.

हे भाकरी केंद्र केवळ एक व्यवसाय नसून महिलांमध्ये उद्योजकतेला वाव देणारा आणि स्थानिक पातळीवर नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा उपक्रम ठरत आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवणाऱ्या या संकल्पनेचे सकल मराठा समाजासह सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे. या नव्या उद्योगाचा शुभारंभ केल्याबद्दल मनीषा पाटील यांचे मान्यवर आणि उपस्थितांकडून मनापासून अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Tags: