बेळगावच्या कॅम्प परिसरात दसरा महोत्सव पारंपरिक उत्साहात पार पडला. वर्षभरातून एकदा सीमोल्लंघनासाठी निघणाऱ्या विविध देवींच्या भव्य मिरवणुकीत यंदा डीजेचा वापर पूर्णपणे टाळून, केवळ पारंपरिक वाद्यांच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

सीमोल्लंघनासाठी आलेल्या के. टी. पुजारी अँड सन्सची श्री मरिअम्मा देवी, मद्रास स्ट्रीटची श्री मुत्तू मरिअम्मा, फिश मार्केटची श्री महामाता कुंतीमाता, तेलुगू कॉलनीची श्री मरिअम्मा-दुर्गाम्मा आणि आर. एल. लाईनची श्री तुलकांतम्मा देवी या उत्सवमूर्तींची मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी मिरवणुकीचा प्रारंभ केला.


या सोहळ्यात कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रिझवान बेपारी, अल्लाउद्दीन किल्लेदार, डॉ. मदन डोंगरे, साजिद शेख, विक्रम पुरोहित, निरंजना अष्टेकर, अरेबिया धारवाडकर आणि डॉ. राहीला शेख यांच्यासह उपस्थितांनी मिरवणुकीतील चित्ररथाचे स्वागत केले.
व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रम आणि भक्तीगीतांचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्यांच्या साथीने मिरवणूक काढण्यात आली. हजारो भाविकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावत देवीचे दर्शन घेतले.
हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


Recent Comments