Belagavi

अनगोळ येथील श्रीराम युवक मंडळ आणि महिला मंडळाकडून भोंडला उत्सव

Share

संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक असलेला पारंपारिक हादगा- ‘भोंडला’ उत्सव अनगोळ येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीराम युवक मंडळ आणि राजहंस गल्ली महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आपली समृद्ध संस्कृती, निसर्ग आणि स्त्रीशक्तीचा जागर करण्याच्या उद्देशाने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून राजहंस गल्ली येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान मध्यभागी हत्तीचे चित्र ठेवून महिला व युवतींनी त्याच्याभोवती फेर धरत भोंडल्याची पारंपारिक गाणी गायली.

आधुनिकतेच्या काळात आपली मूळ संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम युवक मंडळाचे कार्यकर्ते आणि राजहंस गल्ली महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Tags: