Khanapur

खानापूरच्या कसमळगी दुर्गादेवी मंदिरात नवरात्रोत्सव उत्साहात

Share

खानापूर तालुक्यातील श्री क्षेत्र कस मळगी येथील दुर्गादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. गेल्या नऊ दिवसांपासून मंदिरात दुर्गा पुराण प्रवचन आणि दररोज भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या महाप्रसादात पंचपक्वानांचा समावेश होता. कस मळगी व परिसरातील हजारो भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेतला. मंदिर समिती व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे.


या प्रसंगी मंदिर समितीचे अध्यक्ष भीमप्पा बोकडेकर यांनी, अशा धार्मिक उपक्रमांमुळे गावात शांतता व समृद्धी लाभत असल्याचे सांगितले.

गुंडेनट्टीचे पूज्यश्री श्रीकांतय्या हिरेमठ यांनी प्रवचन सेवा दिली. या सोहळ्यात बिळकी रुद्रस्वामी मठाचे पूज्यश्री चन्नबसवा देवरा, माजी आमदार अरविंद पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: