बेळगावातील रेसकोर्स रोड येथील एका कॅफेत मध्यरात्री झालेल्या राडा प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी कारवाई करत दोन प्रमुख आरोपींना अटक केली आहे.
१५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री रेसकोर्स रोडवरील एका लोकप्रिय कॅफेत तरुणांच्या टोळक्याने गोंधळ घालून शांतताभंग केला होता. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत एपीएमसी पोलिसांनी तपास वेगाने पूर्ण केला.

या कारवाईत संगमेश्वर नगर येथील अरमान मल्लिकाजान नदाफ आणि शाहू नगर येथील सामी शाकील तहसीलदार या दोघांना अटक करण्यात आली आहे. घटनेतील इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.


Recent Comments