Belagavi

हंगरगा येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात

Share

हंगरगा गावात आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि महाप्रसाद कार्यक्रमात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, ज्ञानेश्वरीतील पवित्र श्लोक आणि तत्त्वज्ञान हे प्रत्येकाच्या जीवनाला योग्य दिशा देणारे आहे. समाजात प्रेम, शांती, एकता आणि धर्मभावना वाढीस लागावी, अशी प्रार्थना त्यांनी केली.

या सोहळ्याचे आयोजन करणारे पूज्य स्वामी, समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि तरुणांचे त्यांनी आभार मानले. या प्रसंगी युवराज कदम, बाळू देसूरकर, मनोहर बेळगावकर, बाळू पाटील, विष्णू सोनलकर, अर्जुन पाटील, मीना गोडसे, सहदेव सावंत, निवृत्ती तळवार, यल्लाप्पा पाटील, रघू खांडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: