State

‘स्टिंग ऑपरेशन’चे गॉडफादर कोण हे सर्वश्रुत: बी. वाय. विजयेंद्र

Share

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर याचे पडसाद थेट सरकारच्या दारापर्यंत पोहोचतील, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी दिला आहे. ‘स्टिंग ऑपरेशन’च्या वादात सरकार पूर्णपणे अडकले असल्याचे ते म्हणाले.

चित्रदुर्ग येथे पत्रकारांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी राज्यातील गाजत असलेल्या स्टिंग ऑपरेशन वादावर भाष्य केले. केवळ आरोप करून मागे हटण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. स्टिंग ऑपरेशनचे गॉडफादर कोण हे सर्वश्रुत आहे, असे सांगत त्यांनी म्हैसूर दसरा उत्सवातील अव्यवस्था, महिलांच्या जेवणाची गैरसोय आणि गुरांच्या चाऱ्याच्या तुटवड्याचा निषेध केला. काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार हे स्टिंग ऑपरेशनच्या वादात पूर्णपणे बुडाले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

या वेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवत विजयेंद्र म्हणाले की, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली असून दसऱ्यानंतर केंद्रीय समिती कर्नाटकाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेणार आहे. साखर कारखाने उसाच्या वजनात शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप असून, राज्य सरकारने ‘राज्य सल्लागार दर’ (एसएपी) अंतर्गत अतिरिक्त १,००० रुपये दिले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रल्हाद जोशी केंद्रीय स्तरावर प्रामाणिक प्रयत्न करत असून, राज्य सरकारनेही आपली जबाबदारी ओळखून शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात, अशी मागणी विजयेंद्र यांनी केली.

Tags: