Uncategorized

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

Share

विजयनगर जिल्ह्यातील कुडलिगी तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

कानाहोसहळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बणवीकल्लू आणि अमलापूर गावांच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग ५० वर रस्ता ओलांडताना बिबट्याला भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कानाहोसहळ्ळी पोलीस आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. महामार्गावर बिबट्याचा अपघात झाल्याने परिसरातील गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

धडक देऊन पसार झालेल्या वाहनाचा आणि चालकाचा शोध घेण्यासाठी वन विभाग आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली आहे.

Tags: