बेळगाव येथील रेसकोर्स रोडवरील एका कॅफेमध्ये एका तरुणावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी पीडित तरुणाचे नातेवाईक आणि स्थानिकांनी एपीएमसी पोलीस ठाण्यासमोर तीव्र निदर्शने केली.

बेळगावच्या टीव्ही सेंटर जवळील रेसकोर्स रोडवर असलेल्या कॅफेमध्ये २२ वर्षीय कैफ शेरखान याच्यावर अमानुष हल्ला करण्यात आला. या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले असून, आझम नगर येथील रहिवासी आणि कैफच्या नातेवाईकांनी एपीएमसी पोलीस ठाण्याला घेराव घातला. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली.

परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे डीसीपी नारायण बरमणी यांनी तातडीने एपीएमसी पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यांनी संतप्त नागरिकांशी चर्चा करून त्यांना शांत केले. या प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले.


Recent Comments