Bellary

बळ्ळारीतील ताळूर रस्ता मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट

Share

बळ्ळारी येथील ताळूर रस्त्यावरील मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास तीव्र केला असून, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

बळ्ळारी शहरात झालेल्या या हल्ल्याच्या घटनेत एकूण नऊ जण सामील असल्याची माहिती समोर आली असून, पोलीस अधीक्षक सुमन पन्नेकर यांनी या कारवाईची माहिती दिली आहे. पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवून संशयितांच्या घरांवर छापे टाकले आणि या मारहाणीत वापरण्यात आलेली एक कार व दुचाकी जप्त केली आहे.

या हल्ल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असली तरी, अद्याप पाच आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू असून लवकरच त्यांनाही अटक केली जाईल आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Tags: