आमदार आणि मंत्र्यांचे स्टिंग ऑपरेशन होण्याची शक्यता असल्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. गोंधळ न करता सतर्क राहण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याचे त्यांनी म्हटले.
शनिवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आतापर्यंत आमच्यापैकी कोणाचेही स्टिंग झालेले नाही. मात्र सर्व मंत्री आणि आमदारांनी सतर्क राहावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे, असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गुप्त भेटीबाबत विचारले असता, त्यांना गुप्तपणे भेटण्यासारखे काहीच नाही, ते आमचे नेते आहेत, असे जारकीहोळी म्हणाले. जमीर अहमद यांनी चार-पाच वेळा त्यांची भेट घेतली असून त्यासाठी गुप्तपणे जाण्याची गरज नसल्याचे सतीश जारकीहोळी यांनी म्हटले.
गॅरंटी योजनेमुळे परिवहन बसच्या डिझेलसाठी पैसे उरले नसल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, डिझेलचा खर्च परिवहन विभागाकडून केला जातो. गॅरंटी योजनेसाठी फक्त त्या योजनेचा निधी दिला जातो, असे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने सीजेपीला आंदोलनाची परवानगी द्यावी. सीजेपी कोणत्याही एका पक्षापुरती मर्यादित नाही. अनावश्यक संभ्रम निर्माण करण्याऐवजी आंदोलकांना बोलावून चर्चा करावी. आंदोलन करणारे भाजपला मत देणारेच आहेत. सर्व काही पोलिसांना पुढे करून नियंत्रित करणे योग्य नाही, असे सतीश जारकीहोळी यांनी म्हटले.


Recent Comments