Belagavi

बेळगावात करवेचा पुन्हा हैदोस!

Share

म ए युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांच्या विरोधात कर्नाटक रक्षण वेदिका शिवरामेगौडा गटाने हैदोस घातला.

करवेचे जिल्हाध्यक्ष वाजिद हिरेकुडी यांच्या नेतृत्वाखाली काही मूठभर कार्यकर्त्यांनी येऊन राणी चन्नम्मा चौकात हैदोस घातला.
अलीकडे झालेल्या राज्यात सौ पूर्वतयारी बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी मराठी भाषिक विरोधात केलेल्या वक्तव्यावर शुभम शेळके यांनी प्रतिक्रिया दिली. याला लक्ष करत करवेने नेहमीप्रमाणे आपली पोळी भाजून घेत शांतता भंग करत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शिवाय शुभम शेळके यांना हद्दपार करावे अशी हास्यास्पद मागणी देखील केली. यावेळी जमलेल्या मूठभर भाडोत्री कार्यकर्त्यांनी शेळके यांच्या छायाचित्राचे दहन करत आपला कंडू समजवून घेतला

याच दरम्यान भर चौकात उभे राहून वाजिद हिरेकोडी यांनी शुभम शेळके यांना बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करत, धमकी देत कायदा हातात घेण्याचाही प्रयत्न केला.

लोकशाहीने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि या स्वातंत्र्यातून शुभम शेळके यांनी केलेले वक्तव्य याला नेहमीप्रमाणेच कन्नड संघटनांनी लक्ष करत आपले इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र मराठी भाषिक अशा पोकळ वल्गनांना कदापी भिक घालणार नाहीत. मात्र डोळ्यात देखत कायदा हातात घेऊन सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या या कन्नड संघटनांच्या म्होरक्यांवर प्रशासन कोणती कारवाई करते याकडे मात्र मराठी भाषिक लक्ष ठेवून आहेत.

Tags: