Belagavi

म्हैसूर दसरा महोत्सवासाठी हुक्केरी हिरेमठाच्या श्रींना अधिकृत निमंत्रण

Share

जागतिक प्रसिद्ध म्हैसूर दसरा उद्घाटन सोहळ्यासाठी बेळगाव येथील हुक्केरी हिरेमठ संस्थानचे अधिपती आणि अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि कन्नड व संस्कृती खात्याचे मंत्री शिवराज संगडगी यांच्या सूचनेनुसार बेळगाव कन्नड आणि संस्कृती खात्याच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री यांनी श्रींची भेट घेऊन म्हैसूर दसरा महोत्सवाचे निमंत्रण सुपूर्द केले.

निमंत्रण स्वीकारल्यानंतर बोलताना श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी सांगितले की, यंदाच्या म्हैसूर दसरा महोत्सवाचे उद्घाटन कोप्पळच्या गवीसिद्धेश्वर मठाचे श्री अभिनव गवीसिद्धेश्वर स्वामीजी करत असल्याचा विशेष आनंद आहे. म्हैसूरच्या इतिहासात सर्व परंपरांतील साधू-संतांना निमंत्रित करून कर्नाटक ही संतांची भूमी आहे हे दाखवून देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपक्रमाचे स्वामीजींनी कौतुक केले.

उत्तर कर्नाटकात हुक्केरी हिरेमठाचा दसरा महोत्सव अत्यंत प्रसिद्ध आहे. मठाच्या परंपरेनुसार या काळात मठातच उपस्थित राहणे अनिवार्य असल्याने म्हैसूर दसऱ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही, असे स्वामीजींनी स्पष्ट केले. तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी हुक्केरी मठाच्या दसरा महोत्सवाला भेट दिल्याची आठवण त्यांनी या वेळी काढली. म्हैसूर दसरा राज्याची ओळख आहे, तर हुक्केरी दसरा हा सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहे, असे सांगत स्वामीजींनी म्हैसूर दसरा महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

Tags: