Belagavi

बेळगावात ३७ वी विद्या भारती राष्ट्रीय महिला फुटबॉल स्पर्धा उत्साहात सुरू

Share

बेळगावातील अनगोळ येथील संत मीरा इंग्लिश माध्यम शाळेमध्ये आजपासून ३७ व्या अखिल भारतीय विद्या भारती राष्ट्रीय महिला फुटबॉल स्पर्धेचा शानदार प्रारंभ झाला.

देशभरातील क्रीडा गुणवत्तेला वाव देण्यासाठी विद्या भारती बेळगाव आणि संत मीरा शाळेच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या क्रीडा सोहळ्याला शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष स्वप्निल शहा, एकलव्य पुरस्कार विजेते सुनील आपटेकर, निरीक्षक सुबोध बोराह, विद्या भारतीचे प्रदेशाध्यक्ष परमेश्वर हेगडे, राज्य क्रीडा प्रमुख देवेंद्र, अमरनाथ, जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, सचिव डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, क्रीडा प्रमुख चंद्रकांत पाटील, अनुराधा पुरोहित आणि शिवकुमार सुतार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवणार आहेत.

Tags: