खानापूर तालुका पंचायत कार्यालयाच्या सभागृहात तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पंच गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत गृहलक्ष्मी योजनेच्या थकीत निधीचे वितरण आणि नवीन अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा झाली.
बैठकीदरम्यान समिती सदस्य इशॉक खान पठाण यांनी गृहलक्ष्मी योजनेची थकीत रक्कम आणि नवीन अर्ज स्वीकारण्यातील विलंबावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावर सीडीपीओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी थकीत रक्कम लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे स्पष्ट केले.

अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे स्पष्ट केले. याशिवाय बैठकीत हेस्कॉम, परिवहन आणि अन्न नागरी पुरवठा विभागाच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला.


Recent Comments