काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेध करत तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत हुबळीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली.

दिल्लीत केंद्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आंदोलन करत असताना दिल्ली पोलिसांकडून युवा नेते राहुल गांधी यांना अटक करण्यात आली. ही कारवाई अत्यंत निषेधार्ह आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे संविधानाविरोधी काम करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला.

मतचोरी आणि एसआयआर प्रक्रियेबाबत संपूर्ण देश राहुल गांधी आणि काँग्रेसच्या पाठीशी उभा आहे. मात्र, निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सांगण्यावरून काम करत आहे. या प्रकरणी राष्ट्रपतींनी त्वरित हस्तक्षेप करून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची आयोगातून हकालपट्टी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली.
hubali
राहुल गांधी यांच्या अटकेविरोधात हुबळीत काँग्रेसची तीव्र निदर्शने


Recent Comments